
Ladki Bahin Yojana 2024 : महाराष्ट्राचा अभिमान ठरलेली लाडकी बहीण योजना राज्यात जोमाने कार्यान्वित झाली आहे. परंतु अजूनही लोकांना बरेच प्रश्न सतावत आहेत.लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत तर काय करावं? हा प्रश्न पडला असेल तर काळजी करू नका तुमच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हाला ह्या लेखातून मिळतील.
Table of Contents
तिसरा हप्ता मिळणार 29 सप्टेंबर पासून! माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा.
Ladki Bahin Yojana 2024 पैसे अजून जमा झाले नाही तर काय करावं?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ अंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्यानंतर अर्ज मंजूर झालेल्या सर्व बहिणींच्या खात्यात सुरुवातीला ३००० रुपये जमा झाले. आणि आता सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज केलेला महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहेत. परंतु आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत तर काय करावं असा प्रश्न सर्वच बहिणींना सतावत आहे. ह्याकरता तुम्हाला फक्त खाली दिलेली प्रोसेस तपासायची आहे. आणि त्यानुसार सुधारणा करावयाच्या आहेत.
लाडकी बहीण योजना २०२४ चा तिसरा हप्ता २९ सप्टेंबर रोजी सर्व बहिणींच्या खात्यात जमा होणार!
मात्र …. Ladki Bahin Yojana 2024 29 सप्टेंबरला माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडून देण्यात आलेली होती .पण सरकारकडून वेळेपूर्वी बँकांना योजनेमध्ये पैसे पाठवण्यात आल्याने महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याचे प्रक्रिया लवकरच सुरू झालेली आहे. जुलै ऑगस्ट महिन्याचे मिळून ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. परंतु सप्टेंबर महीन्याचा हप्ता अजूनही आलाच नाही. एकूण ४५०० रुपये खात्यात जमा होणे अपेक्षित आहे. तसेच काही महिला भगिनींनी सप्टेंबर महिन्यात अर्ज करून पात्र होऊनही अद्याप एकही हप्ता आलेला नाही. अशावेळी तुमच्याही खात्यात जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनही आलेला नाही तर कुठे तक्रार करावी?
लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana 2024 पैसे जमा झाले नाही तर काय करावे ?
आजकाल प्रत्येकजण एकमेकांना हेच विचारत आहेत, माझा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अर्ज करून सुध्दा अजूनही आला नाही. तर काय करावं?
तर तुमचेसुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून जमा झाले नसतील. तर तुम्ही ह्या काही चुका केल्या असण्याची शक्यता आहे. त्या सुधारल्या की तुमच्याही खात्यात पैसे आलेच म्हणून समजा.
सर्वात आधी अर्ज पात्र ठरलेल्या ज्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जात भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून बघा. तुम्ही हे सुध्दा तपासा की तुम्ही अर्ज भरताना पैसै येण्यासाठी जो बँक खात्याचा नंबर दिला आहे. त्या बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही ह्याची खात्री करा. आणि जर आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर बँक खाते आधार लिंक करून घ्या. शासनाच्या नियमामुळे बँक खात्याला आधार लिंक नसणे हे खात्यात पैसे जमा न होण्याचे महत्वाचे कारण ठरत आहे.
तसेच ज्या महिलांनी अंतर्गत अर्जात बँकेच्या जॉइंट अकाऊंट चा नंबर दिलेला आहे अशा जॉइंट अकाऊंट धारकांच्या खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाहीत. प्रत्येक महीलेचं स्वतंत्र खातं असायला हवं. आपण तसा बदल करुन घेऊ शकता. Ladki Bahin Yojana 2024
तर हेच पैसै न येण्याचं एक कारण आहे.योजनेचे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला तुमचं वैयक्तिक बँक अकाऊंट उघडावं लागेल आणि त्याला आधार कार्ड लिंक करुन घ्या. मग त्या अकाऊंट मध्ये योजनेचे सर्व हप्ते जमा होतील.
कॉल करा 'महाराष्ट्रवादी' व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबरवर
उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार ह्यांच्या राष्ट्रवादीने 'महाराष्ट्रवादी' ही व्हॉट्सॲप हेल्पलाईन लाडक्या बहिणींसाठी सुरु केली आहे. यामध्ये योजनेचे पैसे अजूनही न मिळालेल्या महिला 9861717171 या क्रमांकाशी संपर्क साधून लाडकी बहीण योजने संदर्भातल्या अडचणी सांगू शकतात. ह्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 72 तासांच्या आत संपर्क केला जात आहे आणि महिलांना मागर्दर्शन केले जात आहे .
लेख आवडला असेल तर नक्की इतर बहिणींना शेअर करुन माहिती द्या.
留言